kathak
kathak कथक किंवा कथ्थक ही एक भारतीय नृत्यशैली आहे. ती भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक आहे. (इतर प्रकार - ओडिसी, कथकली, कुचिपुडी, भरतनाट्यम्, मणिपुरी, मोहिनीअट्ट्म आणि सत्त्रिया).
कथ्थक हा उत्तर भारतातील प्रमुख नृत्यप्रकार असून भावप्रधान आणि चमत्कारप्रधान तत्त्वाचा समावेश हे या शैलीचे वैशिष्ट्य आहे. शास्रीयदृष्ट्या या शैलीत गत, तोडे, नायक नायिका भेद, तत्कार, घुंगुरांचा आवाज, तालवादकासह नर्तकाची जुगलबंदी अशा प्रकारांचा समावेश होतो. या गोष्टीमुळे लोकरंजनही होते.
कथक शब्दाचे अर्थ :-
कथक ह्या शब्दाचा व्युत्पत्ती 'कथा कहे सो कथक' अशी सांगितली जाते. म्हणजेच हावभाव आणि हाताच्या व पायाच्या हालचाली वापरून कथा सांगणाऱ्या व्यक्तींपासून कथक हा शब्द आला असे म्हणले जाते. याचाच दुसरा अर्थ कथा सांगणारी शैली म्हणजे कथक असा होतो.
ब्रह्म पुराणामध्ये अभिनेता, गायक, नर्तक यांना 'कथक' असे संबोधले आहे. पाली भाषेमध्ये 'कथको' याचा अर्थ उपदेशक असा आहे. नेपाळी भाषेत 'कथिको' असा शब्द व्याख्याता या अर्थी दिसून येतो. संगीत रत्नाकर या ग्रंथाच्या नृत्याध्यायामधे 'कथक' हा शब्द आला आहे.
एक अभिजात भारतीय नृत्यप्रकार. कथ्थक ( कथक) म्हणजे कथा सांगणारा. लक्षणेने नृत्य गायन आणि अभिनय यांच्या माध्यमातून कथा सांगणारा असा त्याचा अर्थ होतो. कथ्थकांना एकनट किंवा कथोपजीवी असेही म्हणत. उपजीविकेचे साधन म्हणून हे लोक धार्मिक स्वरूप असलेला हा व्यवसाय करीत.
भारतातील अत्यंत पुरातन आणि परंपरासंपन्न लोकनृत्यांनी शास्त्रीय नृत्यांना जन्म दिला. कथ्थक नृत्य रास या लोकनृत्यातून प्रगत झाले. या रासनृत्याचे पुराणांतून ,नाट्यशास्त्रातून तसेच वैष्णव कवींच्या काव्यांतून वर्णन आले आहे. बाराव्या शतकातील वैष्णव पंथाच्या काळात रासनृत्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. संगीत काव्य आणि अभिनय या तीनही कलांचा संगम या नृत्यामध्ये दिसून येत होता. थाट भ्रमरी गत तत्कार हे कथ्थक नृत्यामध्ये असलेले प्रकार त्यात अंतर्भूत होते हे वैष्णव कवींच्या कीर्तनकाव्यावरून स्पष्ट होते. राधाकृष्ण हा रासाचा केंद्रीय विषय. रासनृत्यातील कृष्णकथांचे साभिनय कथन करणाऱ्या व्यक्तींना रासधारी कीर्तनकार अथवा कथ्थक असे म्हटले जाई. पुढे याच वर्गाकडून नृत्याची एक विशिष्ट शैली प्रगत झाली आणि कथ्थकांकडून केले जाणारे नृत्य कथ्थक या नावाने रूढ झाले. पुढे मुसलमानी राजवटीत मोगलांच्या कलात्मक दृष्टिकोनाचा हिंदूंच्या ललित कलांवर झालेला परिणाम कथ्थक या उत्तर भारतीय नृत्यातूनही स्पष्ट दिसतो.
भारतातील मोगल राजांच्या नृत्य संगीतादी कलांच्या प्रेमाने तसेच रसिक वृत्तीमुळे उत्तरेतील प्रचलित धार्मिक नृत्य मुसलमान व पर्शियन नर्तकींकडून दरबारात प्रविष्ट झाले. हिंदू नृत्यकलेचे अंतरंग आणि या वनी बहिरंग यांच्या मीलनातून पूर्वीचे कथ्थक नृत्य एक वेगळेच स्वरूप घेऊन पुढे आले हे नृत्य दरबारी वातावरणाला पोषक अशा विलासाचे साधन बनले हिंदू स्त्रीपुरुषांच्या वेशभूषेच्या जागी अंगरखा ओढणी व चुणीदार पायजमा हा वेश दिसू लागला यावनी नर्तक-नर्तकींना या नृत्यातील मूळचे पारिभाषिक शब्द उच्चारताना त्रास पडत असल्याने उर्दू अथवा फार्सी शब्दांची योजना होऊ लागली असे असूनही मुसलमानांची अभिजात सौंदर्यदृष्टी व रसिकता यांचा परिणाम होऊन पूर्वीचे रासनृत्य अधिक लालित्यपूर्ण व परिणामकारक झाले हेही खरे.
पुढे नर्तक-नर्तकींना समाजात प्राप्त झालेले हीन स्थान आणि कथ्थक नृत्यातील कलागुणांचा झालेला ऱ्हा स ह्यांमुळे हा नृत्यप्रकार काही काळ अवकळलेल्या अवस्थेतच होता तथापि अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात अवधचा नबाब वाजिद अली शाह ह्याने ह्या नृत्याला आश्रय देऊन त्याचे पुनरुज्जीवन केले त्याच्याच काळात कथ्थक नृत्यातील लखनौ घराणे उदयास आले १९२६ मध्ये श्रीमती मेनका सोखी ह्यांनी कथ्थक नृत्य मुंबई येथे सार्वजनिक रीत्या सादर केले तोपर्यंत ते दरबारात किंवा मोजक्या नृत्यशौकिनांच्या बैठकींपुरतेच मर्यादित होते.
कथ्थक नृत्यशैलीची लखनौ जयपूर आणि बनारस अशी तीन प्रसिद्ध घराणी आहेत
लखनौ घराणे :लखनौ घराण्याचे मूळ पुरुष ईश्वरजी हे मूळचे हंडीया गावचे राहणारे आणि व्यवसायाने रासधारी परंपरेतील कथ्थक होते नबाब असफ उद्दौला याच्या कारकीर्दीत ईश्वरजींच्या तिसऱ्या पिढीतील प्रकाशजी हे लखनौमध्ये स्थायिक झाले व दरबारी नर्तक म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्यांचे नातू बिंदादीन महाराज कालिकाप्रसाद यांच्या कलां गुणांनी लखनौ घराणे नावारूपास आले बिंदादीनमहाराज कृष्णभक्त कवी होते त्यांनी रचलेल्या अनेक ठुमऱ्या व भजने कथ्थक नर्तकांसाठी अमूल्य ठेवा बनून राहिली आहेत कालिकाप्रसाद यांचे अच्छनमहाराज लच्छूमहाराज आणि शंभूमहाराज हे तीन पुत्र अच्छनमहाराज यांचे नृत्य लालित्यपूर्ण व लयदार होते शंभूमहाराज व लच्छूमहाराज यांना त्यांनीच नृत्याचे शिक्षण दिले त्यांचे पुत्र बिरजूमहाराज हे लखनौ घराण्याचे सध्याचे श्रेष्ठ नर्तक आहेत लखनौ घराण्याच्या कथ्थकांमध्ये लयकारी लालित्य व उत्कट भावदर्शन ह्यांचा प्रत्यय येतो
जयपूर घराणे: जयपूर घराण्याचा इतिहास फार विस्कळीत स्वरूपात सापडतो या घराण्यातील मूळ कुटुंबे राजस्थानातील बिकानेर येथील राहणारी होती ही व्यावसायिक कथ्थक कुटुंबे पुढे जयपूर दरबारातील नर्तक म्हणून प्रसिद्धीस आली तेथपासून जयपूर घराण्याचा उदय झाला या घराण्याचे मूळ पुरुष भानूजी त्यांच्या वंशातील हरिप्रसाद व हनुमानप्रसाद हे जयपूर दरबारातील प्रसिद्ध नर्तक होते त्यांच्या चुलत घराण्यातील जयलाल व सुंदरप्रसाद यांनी जयपूर घराण्याचे नाव खूपच वाढविले हनुमानप्रसाद यांने नातू चरणगिरधर व तेजप्रकाश हे या घराण्यातील वयाने सर्वांत लहान नर्तक आहेत.
जयपूर घराण्यातील नर्तक-नर्तकींचे पदन्यासांवर विशेष प्रभुत्व असते तत्कार व चक्कर या दोन अंगांमध्ये ते विशेषतः प्रवीण असतात मात्र लालित्याचा अभाव त्यांच्या नृत्यात जाणवतो अभिनयाकडे ते विशेष लक्ष देत नाहीत
बनारस घराणे :बिकानेरचे रासधारी शामलदास हे बनारस घराण्याचे मूळ पुरुष त्यांच्यापासून पाचवे जानकीप्रसाद बनारस येथे प्रसिद्धीस आले त्यांच्यापासून बनारस परंपरा प्रसिद्धीस आली त्यांचे शिष्य दुलाराम गणेशीलाल ( बंधू) व चुनीलाल हे होत दुलारामजी ह्यांच्या तीन पुत्रांपैकी बिहारीलाल हे इंदूर दरबारात तसेच गंधर्व नाटक मंडळीत नर्तक होते त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये नवाबपुतली नावाची अत्यंत प्रसिद्ध नर्तकी होऊन गेली महाराष्ट्रातील कथ्थक शिक्षक केशवराव मोरे व हिरालाल जयपूरवाले हे यांचेच शिष्य दुलारामजींचे दुसरे शिष्य पुरणलाल हे प्रथम इंदूर दरबारात होते व नंतर ते मुंबईत स्थायिक झाले होते तिसरे शिष्य हिरालाल हे बिकानेर व इंदूर दरबारांत नर्तक होते गणेशीलाल यांचे हनुमानप्रसाद शिवलाल व गोपालदास हे तीन पुत्र हनुमानप्रसाद जम्मू पतियाळा बिकानेर व नेपाळ येथे नर्तक होते ‘संगीत भारती’ ह्या दिल्ली येथील संस्थेत ते १९५२ पर्यंत नृत्यशिक्षक होते शिवलाल तबलावादक होते गोपालदास पतियाळा व लाहोर येथे दरबारी नर्तक होते पंजाबमधील कथ्थक नृत्यप्रसाराचे श्रेय त्यांना दिले जाते त्यांची नृत्यशैली पंजाब घराणे म्हणून ओळखली जाण्याइतपत प्रभावी होती गोपालजींच्या शिष्यांमध्ये जुन्या जमान्यातील चित्रपट अभिनेते आषक हुसेन ( भुर्रेखाँ) हे उत्तम नर्तक होते त्यांच्याकडून गोपालजींचे पुत्र कृष्णकुमार यांचे नृत्यशिक्षण झाले सध्या ते दिल्लीस नृत्य शिकवितात आषक हुसेन यांचे चुलत बंधू मीरबक्ष त्यांच्याकडूनच शिकले आषक हुसेन यांचे तिसरे शिष्य हजारीलाल मुंबईत बनारस घराण्याचे नाव चालवीत आहेत त्यांच्या पत्नी सुनयनाजी भारतात अनेक महोत्सवांतून कथ्थक नृत्याचे कार्यक्रम करीत आहेत नटवरी बोलांची बंदिश थाट व अंगचलन ही बनारस घराण्याची खास वैशिष्ट्ये आहेत लखनौ जयपूर व बनारस ही तीनही घराणी मूळची राजस्थानातील असून रासधारी नर्तकपरंपरेतूनच निर्माण झाली.
आज आपण रंगमंचावर कथ्थकाचे जे प्रत्यक्ष स्वरूप पाहतो त्याचे नृत्त ( फक्त शारीरिक हालचालींनी युक्त असे तालबद्ध अंगविक्षेप) व नृत्य ( अभिनययुक्त तालबद्ध अंगविक्षेप) असे दोन विभाग पडतात थाट आमद तुकडे परमेलू परन् व तत्कार हा नृत्ताचा भाग आणि गत भजन ठुमरी हा नृत्याचा भाग कथ्थक नृत्याला तबला पखावज व सारंगी किंवा हार्मोनियम या वाद्यांची साथ असते नर्तक पायांतून जे जे तत् सदृश बोल काढत असतो ते ते तबल्यावर किंवा पखावजवर वादक काढत असतात नर्तकाच्या व वादकाच्या बोलांचा तालमापदर्शक म्हणून सूरवाद्यावर ‘लहरा’ ( तालांच्या मात्रांइतकी सूरमालिका) धरलेला असतो यात अनेक ताल वापरतात त्रिताल सवारी धमार आडा चौताल एकताल चौताल झपताल मत्तताल रूपक इ ताल अधिक प्रचलित आहेत कथ्थक नृत्यातील काही महत्त्वाच्या संज्ञा अशा:
थाट : कथ्थक नृत्याची सुरुवात थाटाने होते थाटामध्ये संथ लयीमध्ये लयबद्ध हालचाल करून नर्तक पुढील नृत्याला लागणारी मानसिक व शारीरिक पूर्वतयारी करीत असतो
आमद : ‘आमद’ हा फार्सी शब्द असून त्याचा अर्थ ‘प्रवेश’ असा आहे संथ लयीमध्ये नाचता येईल अशा पद्धतीने पखावजचे आणि नृत्ताचे बोल एकत्र करून आमदची रचना केलेली असते.
तुकडा : थैई दिग्दिग् तत् इ शुद्ध नृत्ताचे बोल वापरून तुकड्यांची रचना केलेली असते तुकडा म्हणजे लहान बोल एक किंवा एकाहून कमी आवर्तनात येणारा बोल
परमेलू : पखावज नगारा झांज इ निरनिराळ्या वाद्यांचे आवाज व नृत्ताचे बोल यांच्या मिश्रणाने परमेलूची रचना केलेली असते
परन् : फक्त पखावजचे बोल परन्मध्ये वापरले जातात वाढत्या लयीमध्ये केल्या जाणाऱ्या या रचना अत्यंत जोषपूर्ण व कठीण असतात
कवित्त : देवदेवतांच्या स्तुतिवर्णनाने युक्त अशा नटवरी बोलांसह व्रजभाषेत रचलेली छंदयुक्त रचना
चक्कर: चक्कर ही कथ्थक नृत्यातील एक विशेष कृती आहे गोलाकार फिरून परत पहिल्या स्थितीत येण्याच्या कृतीला चक्कर अथवा भ्रमरी म्हणतात अत्यंत वेगाने अनेक चकरा घेण्यासाठी नर्तकाला बरेच परिश्रम घ्यावे लागतात
पढन्त: तुकडे परन् परमेलू हे प्रकार प्रत्यक्ष नाचण्यापूर्वी नर्तक त्यांचे बोल हातावर ताल देऊन सशब्द ( भरी) किंवा हवेत हात फेकून निःशब्द ( खाली) क्रिया करून म्हणून दाखवतो या पद्धतीला पढन्त म्हणतात
गत: गत हा नृत्यविभागातील प्रकार आहे गतनिकास व गतभाव असे याचे दोन प्रकार आहेत गत म्हणजे गती निकास म्हणजे तिचे नीट विवरण गतनिकास म्हणजे चालींचे विवरण गतनिकासामध्ये निरनिराळ्या लालित्यपूर्ण चालींचा समावेश होतो या चाली म्हणजे गती हंसीगती गजगामिनी गती मयूरीगती मृगीगती इ पूर्वी केल्या जात गतभावांमध्ये एखादी लहानशी कथा किंवा नाट्यपूर्ण प्रसंग चेहऱ्यावरील भावतरंगांद्वारा आणि शरीराच्या सूचक हालचालींमधून व्यक्त केला जातो होरी कालियामर्दन इ लहान मोठे कथाप्रसंग गतींतून आविष्कृत केले जातात त्यासाठी शब्दांचा वा गीतरचनेचा आधार घेतला जात नाही अभिनयाच्या विभागातील दुसरा प्रकार गीतावर आधारलेला असतो हिंदुस्थानी संगीतपद्धतीनुसार ठुमरी दादरा भजन वगैरे ज्या संगीतप्रकारांवर हे नृत्य केले जाते ते त्याच नावाने ओळखले जाते बसून भाव करण्यास ‘अदा ’ म्हणतात गीतांचा अर्थ सूचक हावभावांनी व्यक्त केला जातो बिकानेरचे राजनर्तक व बनारस घराण्यातील सुप्रसिद्ध नर्तक हनुमानप्रसाद व लखनौ घराण्यातील शंभूमहाराज बसून भाव करण्यात अत्यंत निपुण होते.
तत्कार :कथ्थक नृत्याचा शेवट तत्कार या नृत्तप्रकाराने केला जातो लयीशी खेळत खेळत लयीचे सुंदर पण कठीण बंध पदन्यासांनी व घुंगुरांच्या आवाजाने प्रदर्शित करणे म्हणजे तत्कार संथ लयीपासून द्रुत लयीपर्यंत सर्व लयींमध्ये तत्कार केला जातो या लयी दाखविताना तालाच्या अंगाने व आड कुआड असा तत्कार केला जातो
वेशभूषा : कथ्थक नृत्याचा आविष्कार करणाऱ्या स्त्रीपुरुषांची वेशभूषा सामान्यपणे दोन प्रकारची असते काही नर्तकी घोळदार परकर पोलका आणि ओढणी असा वेश करतात तर काही चुणीदार पायजम्यावर अंगरखा आणि ओढणी असा वेश करतात बांगड्या कर्णफुले हार बिंदी इ सर्व आभूषणे आवडीनुसार वापरली जातात पुरुषांमध्ये पीतांबर व उत्तरीय असा एक व चुणीदार पायजमा अंगरखा व पटका असा दुसरा वेश केला जातो कथ्थक शैलीमध्ये सांकेतिक मुद्राभिनय जवळजवळ नाहीच प्रत्यक्ष चेहऱ्यावरील अभिनय असो वा शारीरिक अभिनय असो वास्तवाशी जुळणारा आणि म्हणूनच सहजसुलभ अभिनय हेच या शैलीचे वैशिष्ट्य आहे यात लोकधर्मी अभिनय केला जातो कथ्थकमधील भावदर्शन संपूर्णतः व्यक्तिगत असते या वैयक्तिक स्वातंत्र्यामुळे कथ्थक नृत्यकाराला चाकोरीतून जाण्याची गरज पडत नाही नित्यनवीन कल्पनांचा आविष्कार करण्याची संधी कलाकाराला नेहमीच मिळत राहते परंतु धर्मांनुसार अवस्थांनुसार वयांनुसार नायिकाभेदांचा अभिनय करताना नर्तनातील अंगविक्षेप व सात्त्विक अनुभाव अलंकारशास्त्रानुसारच करावयाचे असतात कथ्थक नृत्यप्रकारात आजपर्यंत अच्छनमहाराज शंभूमहाराज सुंदरप्रसाद जयलाल गोपालजी भुर्रेखाँ जयकुमारी इ नर्तक-नर्तकी होऊन गेले आहेत सध्याच्या प्रसिद्ध नर्तक-नर्तकींमध्ये लच्छूमहाराज बिरजूमहाराज कृष्णकुमार गोपीकृष्ण रोशनकुमारी सितारादेवी दमयंती जोशी ह्यांचा अंतर्भाव होतो .
No comments:
Post a Comment