भरतनाट्यम्-Bharatnatyam
प्रचलित असणाऱ्या नृत्यशैलीत बहुतेक सर्वात जुनी असणारी नृत्यशैली म्हणजे "भरतनाट्यम्" होय मंदिरामध्ये केल्या जाणाऱ्या पूजा नृत्यांमधून ही नृत्यशैली उगम पावली . शतकानुशतके मंदिरामध्ये अधिक श्रद्धेने हे नृत्य शैली जोपासली गेली. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातले नियम काटेकोरपणे पाळत व उत्कट भावाविष्कार करत ही शैली विकसित झाली.अशा या नृत्यशैली चा इतिहास व तिच्या तंत्राविषयी आपण प्रकरणात जाणून घेणार आहोत तसेच भारतात प्रचलित असणाऱ्या इतर शास्त्रीय नृत्य शैली विषयी सुद्धा आपण माहिती करून घेणार आहोत.
भरतनाट्यम् :- भरत नाट्यम हे तामिळनाडू मध्ये उदयास आलेली नृत्यशैली आहे .अतिशय समृद्ध असणारी ही नृत्यशैली देवदासी प्रथेतून पुढे आलेली आहे "देवदासी" म्हणजे "देवाला अर्पण करण्यात आलेली मुलगी". या देवदासी देवळात नृत्य-गायन करून देवाला आपली पूजा अर्पण करत असत सुरुवातीला देवदासी हे नृत्य करीत असत म्हणून याचे पूर्वीचे नाव "दासीअट्टम्" असे होते. अनेक गुरु व नटूवनार ( नृत्य शिक्षक की जो नटुवांगंम् वाजवत असतो) यांचा अथक परिश्रमाने या नृत्याचे पुनरुज्जीवन झाले आणि त्याला अतिशय कलात्मक असे "भरतनाट्यम्" हे नाव मिळाले.
भरत ही संज्ञा भाव, राग आणि ताल या प्रत्येकातील पहिले अक्षर घेऊन (भ+ र +त) बनलेली आहे. नाट्य म्हणजे नृत्याला दिलेली अभिनयाची जोड होय. भरतनाट्यम या नृत्य शैली च्या सादरीकरणात हलचाली मुकाभिनय व संगीत हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते . नृत्यशैली सामान्यपणे एकल पद्धतीने स्त्री नर्तिका सादर करते. पण "कुरवंजी" हा जो नृत्य नाट्याचा प्रकार आहे यात मात्र अनेक नर्तिका भाग घेतात व त्या नायिका 'कुरती' च्या सख्या म्हणून भूमिका करतात.
अडवू :-भरतनाट्यमच्या शिक्षणात "अडवू " हा सर्वात मूलभूत आणि प्राथमिक प्रकार आहे, ज्यात शरीराचे विविध अवयव हात ,पाय, मान ,डोळे इत्यादींच्या हालचाली समन्वय साधला जातो .
भरतनाट्यम साठी वापरले जाणारे संगीत हे परंपरागत दाक्षिणात्य पद्धतीचे कर्नाटक संगीत आहे. सात मुख्य ताल यात वापरले जातात -ध्रुव ,मट्य, रूपक ,झंब, त्रिपुट व एकताल . हे ताल दर्शविण्यासाठी तालाची वेगवेगळी अंगे - लघु, ध्रुतम् , अनुधृतम् , ही वापरली जातात . "जाती" हा लयबद्धअक्षरांचा समूह आहे, त्यांची नावे तिश्र (३अक्षरे ) ,चतुश्रं ( ४अक्षरे) मिश्र (७अक्षरे )खंड (५अक्षरे ) व संकीर्ण (9 अक्षरे) अशी आहेत . या जातींचा सात तालांची संयोग होऊन एक संपूर्ण ताल तयार होतो
हा सर्वात मूलभूत आणि प्राथमिक प्रकार आहे, ज्यात शरीराचे विविध अवयव हात ,पाय, मान ,डोळे इत्यादींच्या हालचाली समन्वय साधला जातो .
भरतनाट्यम् ही नृत्यशैली "एक आहार्य" म्हणून ओळखली जाते विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा विषयावर सादर केल्या जातात म्हणून याला "एक आहार्य "म्हणतात. भारतनाट्यमचा मंच सादरी करण्याची सुरुवात "अलारिपू "ने होते, त्यानंतर शुद्ध नृत्याचा प्रकार 'जतिस्वरम् ' सादर होतो जातिस्वरम् नंतर "शब्दम्" हा अभिनयाचा प्रकार सादर केला जातो ,त्यानंतर सादर होणारी "वर्णम् " ही रचना भरतनाट्यमच्या सादरीकरणात अतिशय महत्त्वाची मानली जाते ,यात नृत , नृत्य व नाट्य या तिन्ही चा समावेश असतो वर्णम् नंतर अभिनयाची रचना "पदम् " सादर केली जाते. त्यात अभिनयाच्या सूक्ष्मछटा दर्शवल्या जातात सर्वात शेवटी सादर होणारा "तिल्लाना" हा प्रकार नृत्याचा रचनेचे एक सुंदर असे उदाहरण आहे.
भरतनाट्यम साठी वापरले जाणारे संगीत हे परंपरागत दाक्षिणात्य पद्धतीचे कर्नाटक संगीत आहे. सात मुख्य ताल यात वापरले जातात -ध्रुव ,मट्य, रूपक ,झंब, त्रिपुट व एकताल . हे ताल दर्शविण्यासाठी तालाची वेगवेगळी अंगे - लघु, ध्रुतम् , अनुधृतम् , ही वापरली जातात . "जाती" हा लयबद्धअक्षरांचा समूह आहे, त्यांची नावे तिश्र (३अक्षरे ) ,चतुश्रं ( ४अक्षरे) मिश्र (७अक्षरे )खंड (५अक्षरे ) व संकीर्ण (9 अक्षरे) अशी आहेत . या जातींचा सात तालांची संयोग होऊन एक संपूर्ण ताल तयार होतो
No comments:
Post a Comment