कथकली
केरळ या आपल्या 300 वर्षे प्राचीण शास्त्रीय नृत्य प्रकारासाठी जगभरात प्रसिद्ध आहे, ज्या प्रकारात, बॅले, ओपेरा, मास्क आणि माईम यांची वैशिष्ट्ये एकत्र आलेली दिसतात. कूटियट्टम, कृष्णनअट्टम आणि कलरिप्पयट्टु सारख्या अन्य कलांमधून हा प्रकार विकसित झाला असे मानले जाते. कथकलीमध्ये भारतीय पुराणे आणि महाकाव्यांमधील कथा व संकल्पना सादर केल्या जातात.
संध्याकाळच्या वेळी देवळात सादर होणारी कथकलीची प्रस्तावना केलीकोट्टू किंवा ढोल वाजवून केली जाते जोडीला चेंगीला (गाँग) असतो. यात रंग, भाव, संगीत, नाट्य आणि नृत्य यांचा असा मेळ दिसतो जो अन्य कोणत्याही प्रकारात दिसत नाही.
कथकली मेक-अप:
भव्य पोषाख आणि चेहऱ्यावर रंगकाम. वेशम किंवा मेक-अपला पुष्कळ महत्त्व असते, तो पाच प्रकारचा असतो, पचा, काठी , थाडी , कारी आणि मिनुक्कु.कथकलीची शोभा आणि भव्यता ही एकतर वेशामुळे असते ज्याचा एक भाग असतो किरिटम किंवा मोठा मुकुट आणि कंचुकम म्हणजे मोठा अंगरखा आणि पायघोळ घागरा जो जाड्या उशा लावून वर घातला जातो. कलाकाराची ओळख पूर्णपणे लपली जाते आणि प्रत्यक्ष आकारापेक्षा मोठी अशी अमानवी आकृती निर्माण करायचा प्रयत्न केला जातो.
पचा (हिरवा):
पचा वेशम किंवा हिरव्या रंगाचा मेक-अप केलेला सद्गुणी नयक
काठी (सुरा):
काठी वेशम खलनायकांसाठी
थाडी (दाढी):
दाढी युक्त किंवा थाडी वेशम तीन प्रकारचे असतात.
- अतिमानवीय वानर सदृश मनुष्याची "वेल्ला थाडी" किंवा पांढरी दाढी
- दुष्ट चरित्रांसाठी “चवन्न थाडी” किंवा लाल दाढी
- “करुता थाडी” किंवा काळी दाढी शिकाऱ्यांसाठी
कारी (काळा):
कारी वेशम राक्षसींसाठी
मिनुक्कु (सुन्दर आणि सौम्य):
“मिनुक्कु वेशम” स्त्रिया आणि संतांसाठी
मुद्रा
मुद्रा ही शैलीदार हस्त भाषा असते जी एखादी संकल्पना, परिस्थिती किंवा स्थिती सांगण्यासाठी वापरली जाते. कथकली कलाकार मुद्रांद्वारे संकल्पना व्यक्त करतो. यासाठी हस्तमुद्रांवर आधारित ग्रंथ ’हस्तलक्षणदीपिका’ याचा अभ्यास करून एक व्यवस्थित संकेत भाषा वापरतो.
कथकली संगीत
कथकली वाद्यवृंद दोन प्रकारच्या ढोलांपासून बनतो – मड्डलम आणि चेन्दा, चेंगीला हा बेल-मेटलचा गाँग असतो आणि इलथलम किंवा झांजाही असतात.
कथकली प्रशिक्षण
कथकली विद्यार्थ्यांना कठोर प्रशिक्षणाला सामोरे जावे लागते ज्यात तेल मसाज, डोळे, ओठ, गाल आणि मानेसाठी वेगवेगळे व्यायाम असतात. नृत्य म्हणजे नाच आणि गीथम म्हणजे गाण्यात अभिनय किंवा भाव सर्वात जास्त महत्त्वाचा असतो.
चेहऱ्यावरील सूक्ष्म भाव, मुद्रा, वाद्य आणि शब्द संगीत यांच्या मदतीने कथकली, प्राचीन काळच्याकथा भव्य ग्रीक नाटकांच्या शैलीसारख्या सादर करतात. केरळ कलामंडलम ही कथकलीचे प्रशिक्षण देणारी एक प्रमुख संस्था आहे.
No comments:
Post a Comment